ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅब्ससाठी महत्वाच्या सूचना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 07:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅब्ससाठी महत्वाच्या सूचना

शहर : देश

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात याची संख्या वाढताना दिसत आहे. यावर आळा बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर भारतात आज जनता कर्फ्यू सुरु झाला आहे. दरम्यान भीतीचे वातावरण पसरल्याने कोरोनाची चाचणी करण्यासाठी अनेकजण लॅबच्या बाहेर रांगा लावत आहेत. या चाचणी दरम्यान जनतेची आर्थिकदृष्ट्या फसवणूक टाळण्यासाठी तसेच अधिक सुरक्षित तपासणी होण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबला कोरोना रुग्ण तपासणीसाठी निर्देश जारी केले आहेत. यानुसार कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडून ४ हजार ५०० रुपयांपर्यंतच रक्कम आकारली जावी. यामध्ये स्क्रीनिंग टेस्टसाठी १,५०० तर इतर अतिरिक्त चार्जचे ३,५०० रुपयाचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे.

शरीरातील तापमान ३८ अंशाहून अधिक वाढणे, सर्दी-खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत. यापैकी काही जाणवू लागले तरी रुग्ण आता थेट लॅब गाठत आहेत. त्यामुळे लॅबवर ताण पडतोय. यासाठी आयसीएमआरने निर्देश दिले आहेत. सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंगसाठी देखील सुचना केल्या आहेत. कोरोना संशयित रुग्णांचे स्वतंत्ररित्या घेण्यात यावे असे यात म्हटले आहे. अधिकृत वैद्यकिय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानंतरच रुग्णाची कोरोनाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना संशयितांचे सॅम्पल घरी जाऊन घ्यावे. त्यामुळे त्यांच्या प्रवासादरम्यान इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता कमी असेल. कोरोना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ती ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. संशयित रुग्णाची चाचणी करताना त्याच्याकडून वास्तव्याचा सरकारी पुरावा घ्यावा असे देखील या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

                                           

मागे

कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु
कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु

जगभरातील 186 देशांमध्य कोरोना व्हायरस पोहोचल्यानंतर सगळ्याच देशांच्या चिंत....

अधिक वाचा

पुढे  

१८६ देशांमध्ये कोरोनाची लागण, ११,८३० जणांचा बळी
१८६ देशांमध्ये कोरोनाची लागण, ११,८३० जणांचा बळी

भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाच्या ....

Read more