ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोलकाता येथे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 14, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोलकाता येथे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोल

शहर : देश

कोलकाता येथे निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशातील निवासी डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रातील मार्ड संघटनाही त्यात सहभागी असेल. राज्यभरातील हजार निवासी डॉक्टर आज कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचं आश्वासन मार्डनं दिलं आहे. मात्र तरी देखील या आंदोलनाचा पालिका आणि सरकारी रुग्णालयांतल्या आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत वारंवार आवाज उठवूनही सरकार दुर्लक्ष करतं. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांचा अभाव, जमावाला रोखण्यासाठी साधनांची कमतरता यामुळे काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे मात्र ती दुबळी आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्या सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं मार्डनं म्हटलं आहे.पश्चिम बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस असल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संपामागे भाजप आणि माकपाचा हात असल्याचा आरोप केला असून डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश दिले आहेत.

रुग्णालयाच्या आवारांमध्ये बाहेरचे लोक येऊन संप चिघळवत असून हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात दुपारी ममता पोहोचल्या आणि डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र संपकरी डॉक्टरांनी हे आदेश धुडकावून लावत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

मागे

अपघातग्रस्त एएन-३२मधील शहिदांचे मृतदेह हाती
अपघातग्रस्त एएन-३२मधील शहिदांचे मृतदेह हाती

अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायूदलाच्या एएन-३२ या वि....

अधिक वाचा

पुढे  

दुर्घटना टळली; ठाण्यात नितीन कंपनीजवळ कोसळला सिग्नलचा खांब
दुर्घटना टळली; ठाण्यात नितीन कंपनीजवळ कोसळला सिग्नलचा खांब

मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घट....

Read more