ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम

शहर : देश

जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम गेल्या महिन्यात भारताच्या परदेशी व्यापारावरही झाला आहे. देशाच्या आयात आणि निर्यात दोन्हींमध्येही नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निर्यातीत काहीशी घसरण झाली. तर आयातीमध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरणीची नोंद करण्यात आली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात गेल्या वर्षी याच महिन्यातील २६.०७ अब्ज डॉलरवरुन घसरुन २५.९८ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात निर्यात कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात भारताने २६.३८ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती.

नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलियम आणि रत्नभूषण या व्यतिरिक्त इतर वस्तूंची निर्यात गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत .०८ टक्क्यांनी वाढून १९.३१ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या वस्तूंची निर्यात १८.५५ अब्ज डॉलर इतकी झाली होती.

अधिकृत आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये आयात मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १२.७१ टक्क्यांनी घसरून ३८.११ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयात ४३.६६ अब्ज डॉलर्स इतकी होती.यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तेलाची आयात ११.०६ अब्ज डॉलर इतकी झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १३.५२ डॉलर किंमतीच्या तेलाची आयात करण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत तेल आयातीतील डॉलरचे मूल्य १८.१७ टक्क्यांनी कमी झालं आहे.

मागे

ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात
ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात

एकावर एक मोफत, एक वस्तू खरेदी करा दुसऱ्यावर ३० टक्के सूट मिळावा... या अशा काही ....

अधिक वाचा

पुढे  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी

 नवी दिल्ली -  फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली श....

Read more