ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्याच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असो.चा आक्षेप

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्याच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असो.चा आक्षेप

शहर : रत्नागिरी

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून लाखोंच्या संख्येने चाकरमान्यांना कोकणात सोडण्यात येत आहे. यावर आता थेट इंडियन मेडिकल असोसिएशननेच आक्षेप घेतला आहे. कोरोना संसर्गाचा धोका असताना चाकरमान्यांना अशा पद्धतीने कोकणात पाठवणं चुकीचं असल्याची भूमिका मेडिकल असोसिएशनने घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोविडचे संकट असताना कोकणात मोठ्या संख्येने चाकरमान्यांना पाठवणं अयोग्य असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. या संदर्भातील मेडिकल असोसिएशनने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आक्षेप घेतला आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात पाठवण्याचा निर्णय चुकीचा आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलंय.

या निर्णयाने कोकणातील आरोग्य व्यवस्था कोलमडेल. तसेच 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी देखील चुकीचा आहे, असंही मेडिकल असोसिएशनच्या या पत्रात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. 3-4 लाख नागरिकांना येऊ दिलं, तर रत्नागिरी जिल्ह्यावर मोठं संकट कोसळू शकतं. आयएमडी संघटनेचे कोविड समन्वयक निनाद नाफडेंनी पत्र पाठून सरकारला याबाबत वेळीच पावलं उचलण्याची कळकळीची विनंती केलीय.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो चाकरमाने एसटी बसमधून कोकणात दाखल होवू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच 21 एसटी गाड्या दाखल झाल्यात. गुहागरमध्ये सर्वाधिक गाड्यांमधून चाकरमानी दाखल झालेत. गुहागर तालुक्यात 9 एसटी बसमधून चाकरमानी आले आहेत. या खालोखाल चिपळूणमध्ये 8, दापोलीत 4, रत्नागिरी तालुक्यात 3 बसेस दाखल झाल्या. आज आणखी 21 बस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे चाकरमानी आता कोकणात गणेशोत्सवासाठी लालपरीने दाखल होवू लागलेत.

 

मागे

सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी, अन्यथा क्वारंटाईन - महापौर पेडणेकर
सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी, अन्यथा क्वारंटाईन - महापौर पेडणेकर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी ....

अधिक वाचा

पुढे  

शेतकऱ्यांची बंधनातून मुक्ती! शेतकरी देशात कुठेही स्वत: विकू शकणार शेतमाल
शेतकऱ्यांची बंधनातून मुक्ती! शेतकरी देशात कुठेही स्वत: विकू शकणार शेतमाल

शेतकऱ्यांवर आजवर लादलेल्या बंधनातून मुक्ती मिळण्याची शक्यता तयार झाली आह....

Read more