ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय रेल्वेकडून परिस्थितीचं गांभीर्य सांगणारं ट्विट, लोकांना केलं भावनिक आवाहन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय रेल्वेकडून परिस्थितीचं गांभीर्य सांगणारं ट्विट, लोकांना केलं भावनिक आवाहन

शहर : देश

कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. देशातील 30 राज्यात लॉकडाऊन आहे, अनेक जिल्ह्यात कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना घरात राहण्यास सांगितले जात आहे. कोरोनाच्या भीतीने भारतीय रेल्वेही बंद आहे, म्हणून आता रेल्वे मंत्रालय लोकांना घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करीत आहे. ज्या प्रकारे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत आवाहन केलं आहे. त्यावरुन परिस्थितीचं गांभीर्य खरंच लक्षात येतं.

सोमवारी रात्री रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत म्हटलं की, 'भारतीय रेल्वे युद्धकाळातही थांबली नाही. कृपया परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. आपल्या घरीच थांबा.'

देशाच्या इतिहासात प्रथमच प्रवासी रेल्वे थांबविण्यात आली आहे. सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आणि फक्त मालगाड्या चालविण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे आता लोकांना सांगत आहे की आपण घरीच राहावे.

केवळ रेल्वे सेवाच नाही तर देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेली मेट्रोही बंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, कोलकाता, बंगळुरू, मुंबई, कोची, नागपूर आणि इतर मेट्रो सेवा 31 मार्चपर्यंत बंद आहेत.