ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले

शहर : देश

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६,३८,८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ,४५,३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १०,५७,८०६ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गुरुवारी देशभरात एकूण ,४२,५८८ कोरोना चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये घाबरून जाऊ नकाअसे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा हा वेग नागरिकांना नक्कीच चिंतेत टाकत आहे.

महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ११,१४७ रुग्ण आढळले. तर २६६ जणांचा मृत्यू झाला. परंतु, काल राज्यात कोरोनावर मात केलेल्या ८८६० रुग्णांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६०.३७ % एवढे झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीत आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. मात्र, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. गुरुवारी पुण्यात कोरोनाचे ,६९९ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५३,४३७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौराही केला होता.

 

मागे

अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या
अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या

शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा ....

अधिक वाचा

पुढे  

Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात
Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात

येस बँकेने कर्ज थकवणाऱ्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं (ADAG) मुंबईतील मुख्याल....

Read more