ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ

शहर : देश

देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी सतत वाढते आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 736 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येने तब्बल 17 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे. तर सध्या 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात आतापर्यंत 11 लाख 45 हजार 630 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 37 हजार 364 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना रुग्ण संख्येत जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करता अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा

देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. शनिवारी राज्यात 9,601 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 4,31,719 एवढी झाली आहे. यापैकी 1,49,214 ऍक्टिव्ह रुग्ण असून, आजपर्यंत एकूण 2,66,883 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

मागे

दोनदा आरक्षण घेता येणार नाही, राज्य सरकारकडून नवं परिपत्रक, मराठा समाजासह भाजपकडून कडाडून विरोध
दोनदा आरक्षण घेता येणार नाही, राज्य सरकारकडून नवं परिपत्रक, मराठा समाजासह भाजपकडून कडाडून विरोध

मराठा आरक्षणाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण आता खुल्या प्रवर्गातील आ....

अधिक वाचा

पुढे  

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचं निधन
आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचं निधन

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचं दीर्घ आजाराने निधन झा....

Read more