By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘GSAT-३०’ या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर-पूर्वेकडील कैरो बेटावरुन हे प्रक्षेपण पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी करण्यात आले. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार हा उपग्रह इनसॅट-४ एच्या जागी काम करील.
या नव्या व आधुनिक उपग्रहामुळे येणा-या पुढील काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे. इनसॅट-४ हा उपग्रह २००५ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. परंतु बदलत्या काळाप्रमाणे शक्तीशाली आणि आधुनिक उपग्रहाची गरज लागते आणि त्यामुळेच आज या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यामुळे इनसॅट - ४ ची जागा आता ‘GSAT-३०’ घेणार आहे.
दरम्यान, ‘GSAT-30’ हा उपग्रह जिओ इलिप्टिकल ऑर्बिटरमध्ये स्थापित करण्यात आला असून याचे वजन अंदाजे ३१०० किलो आहे. तसेच हा उपग्रह लाँचिंगपासून सुमारे 15 वर्षे कार्यरत राहणार आहे. मोबाइल सेवा, व्हिसॅट नेटवर्क, टेलिव्हीजन अपलिंकिंग, टेलीपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डिटीएच टेलिव्हीजन आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे.
RT Isro: #Ariane5 Flight #VA251 carrying #GSAT30 and EUTELSAT KONNECT successfully liftoff pic.twitter.com/PtIIqzRZDs
— Space and Isro News (@TheIndianSpace) January 16, 2020
या वर्षी भारताकडून एकूण १० उपग्रह लाँच करण्यात येणार आहेत. आदित्य-एल१ उपग्रहालाही येत्या वर्षात लाँच केले जाईल. हा सूर्याचा अभ्यास करणारा भारताचा पहिला उपग्रह असेल. इस्रोने मागच्या वर्षी एकूण ६ लाँच वाहन आणि ७ सॅटेलाइट लाँच केले होते.
सायन ते माटुंगा स्टेशनदरम्यान आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी र....
अधिक वाचा