ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताने पाकिस्तानला दिले कडक शब्दात उत्तर

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताने पाकिस्तानला दिले कडक शब्दात उत्तर

शहर : delhi

भारताने रविवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना त्यांचं वक्तव्य हे बेजबाबदारपणाचं असल्याचं म्हटलं आहे. भारताकडून १६ ते २० एप्रिलदरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला होऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर पाकिस्तानने भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांना नोटीस पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असे वक्तव्य करुन युद्धाच्या गोष्टींना बळ देत असल्याची टीका केली आहे.
कुमार यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे युद्धाला प्रोत्साहन देणारे वक्तव्य करत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही तथ्य नाही. पाकिस्तानातील दहशवताद्यांनी भारतात हल्ले करावे म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत. भारताला सिमेपलीकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि संरक्षणासाठी चोख उत्तर देण्याचा अधिकार आहे.'
काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला होता. ज्यामध्ये ४० भारतीय़ जवान शहीद झाले होते. यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत त्यांचे तळ उद्धवस्त केले होते.
कुमार यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, भारतात सिमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तान जबाबदारी झटकू शकत नाही. पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवाद्यांविरोधाक पाऊल उचलवण्याची गरज आहे.' पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारताने त्यांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

मागे

अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची “धनुष” तोफ दाखल
अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची “धनुष” तोफ दाखल

जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या रेतीमधूनही शत्रूंवर थेट लक्ष्य साधणारी स्....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी
भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा क....

Read more