By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
पाकिस्तानची आर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे पाकिस्तानपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या देशात महागाईचा उच्चांक गाठला गेला आहे. ८.०२ टक्के महागाईचा दर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाला आहे. सगळ्याच वस्तुंचे दर गगणाला भिडले आहे. भाज्या, दूध यांचे दर जवळपास शंभरीपर्यंत पोहोचले आहेत. टॉमेटा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. यावरुन येथे किती महागाई आहे, हे लक्षात येईल. या महागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे पुरते कबंरडे मोडले आहेत. चलनाचा विचार करता डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन बांग्लादेश, भुतान यांच्यापेक्षा कमी किमतीचे झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये पुढील आर्थिक वर्षामध्ये महागाईमुळे चलनवाढीच्या दरावर परिणाम होईल. स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान (एसबीपी) इशारा दिला आहे की, देशात अशीच महागाई राहिली तर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येईल. तर दुसरीकडे पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत कोसळला असून, शुक्रवारी पाकिस्तानी रुपयाची किंमत प्रती डॉलर १५० रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सहा अब्ज डॉलरची मदत देताना कठोर अटी लादल्या आहेत. यात चलन विनियमयाचा दर बाजाराला ठरवू देण्याचीही अट आहे. तर खुल्या बाजारात पाकिस्तानी रुपयाची किंमत प्रती डॉलर १५० रुपये आहे.
गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. ही महागाई खूप वाढली आहे. गरिबांचे जीवन जगने मुश्कील झाले आहे. साखर, तेल, पेट्रोल यांचे दर गगणाला भिडले आहेत. तर विजेचा प्रश्न आहे. तसेच गॅसचे दरही वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महागाईमुळे चोरीत वाढ झाल्याचे येथील नागरीक सांगतात. महागाईवर सरकारचे नियंत्रण नाही. देशात वीजचे, गॅसचे दर वाढत आहेत. देशात महागाई वाढत आहे, याची आपल्याला कल्पना आहे, पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात ३.९२ टक्के महागाई होती. मात्र, आताच्या महागाईचा विचार करता ती अडीच पट वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलमधील (व....
अधिक वाचा