By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या हाथरसमध्ये जात आहेत. संजय सिंहदेखील पीडितेच्या कु़टुंबियांना भेटायला गेले होते. त्यावेळी कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. (Ink thrown on Aam Aadmi Partys MP Sanjay Singh while visiting the victim’s family in Hathras)
हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे सुद्धा त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
पीड़ित परिवार को सांत्वना देने पहुंचे @AamAadmiParty सांसद @SanjayAzadSln जी पर स्याही फेंकवा कर भाजपा ने आज अपने स्याह पक्ष को उजागर कर दिया है।
— Aam Aadmi Party- Uttar Pradesh (@AAPUttarPradesh) October 5, 2020
संजय सिंह जी पर जो स्याही फेंकी गई है उसी स्याही से योगी के काले कारनामों का काला इतिहास लिखा जाएगा। pic.twitter.com/lLAuiCVzzf
घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आप पक्षाच्या उत्तर प्रदेश विभागाने, हा दिवस योगी आदित्यनाथ यांच्या शासनकाळातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, असे म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन केले जात असल्याचा आरोपही आप पक्षाने केला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता पोलिसांडून अडवले जात असून मारले जात आहे, असेही आप पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोपही आप पक्षाने केला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्कबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आम्ही केलेली चौकशी प्रोफेशनल होती. एम्सनेही सुश....
अधिक वाचा