ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश, प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 06:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश, प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ

शहर : मुंबई

मुंबई बँकेतील (मुंबै बँक) गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

सरकार आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीसाठी सहकार विभागातील अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

खालील बाबींची होणार चौकशी

- बँकेला झालेल्या ४८ कोटी रुपयांच्या तोट्याची चौकशी होणार

- बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी

- बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी

- गृहनिर्माण संस्थांना स्वयंपूर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी

- बँकेचे मुख्यालय शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्चाची चौकशी

- मागील पाच वर्षात संगणकीय प्रणाली अद्ययावत करणे, संगणक खरेदी यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी

- भांडवलात घट होऊन ते .११ टक्के कसे झाले

या सर्व प्रकरणात मुंबई बँकेचे चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्यात आला होता. तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता.

 

मागे

स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी
स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार
राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परव....

Read more