ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तिसऱ्या विनाशिका आयएनएस इंफाळचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तिसऱ्या विनाशिका आयएनएस इंफाळचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण

शहर : मुंबई

विशाखापट्टम वर्गातील तिसऱ्या विनाशिकेचे आयएनएस इंफाळचे आज नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतील माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले. जलावतरण वेळी आयएनएस इंफाळचे वजन हे 3027 टन एवढे होते. यापुढच्या काळांत या युद्धनौकेवर विविध यंत्रणा, विविध युद्धसामग्री बसवल्या जातील, त्यानंतर विविध चाचण्यांनंतर 2023 मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.

याआधी विशाखापट्टम वर्गातील आयएनएस विशाखापट्टम आणि आयएनएस मोरमुगावो या दोन युद्धनौकांचे जलावतरण झाले असून त्यावर विविध यंत्रणा आणि युद्धसामग्री बसवण्याचे काम सुरू आहे. या विशाखापट्टम वर्गातील युद्धनौका 2021 पासून नौदलात दाखल व्हायला सुरुवात होतील, त्यावेळी त्या जगातील एक अत्याधुनिक युद्धनौकांपैकी म्हणून ओळखल्या जातील, नौदलाच्या ताकदीमध्ये यामुळे मोठी भर पडणार आहे.

मागे

जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया
जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया

केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या आकाशात भरारी घेणारी भारतीय विमान कंपनी जे....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसच्या अडचणीत वाढ, मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल...
काँग्रेसच्या अडचणीत वाढ, मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल...

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिल....

Read more