By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 04:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
श्रीनगर - जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने हटविल्यानंतर बंद असलेली इंटरनेट सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहे. आज जम्मू-काश्मिरमधील १० जिल्हयांची इंटरनेट, प्रीपेड सिमकार्डवरील व्हाईस आणि एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मिरचे पिंसिपल सेपेटरी कन्सल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पसरवण्यासाठी ३६ केंद्रीय मंत्री आजपासून गुरुवारपर्यंत जम्मू-काश्मीर दौ-यावर आहेत. काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना हे मंत्री भेट देणार आहेत. तसेच कलम ३७० टविल्यानंतर झालेल्या विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहचविणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आजपासून जम्मू-काश्मिरच्या दहा जिल्ह्यांमधील इंटरनेट, प्रीपेड सिम कार्डवरील व्हाईस आणि एसएमएस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, बडगाम, गंडरबल, बारानमुला, श्रीनगर, कुलगाम, अनंतनाग, शोपियान आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा तुर्तास बंद राहणार आहे.
मुंबई - डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद मुकेश अंब....
अधिक वाचा