ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 07, 2021 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

शहर : मुंबई

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत होती. परंतु नगराळे यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांची कारकीर्द

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

हेमंत नगराळे आणि वाद

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेची परवानगी घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात तक्रार

नगराळेंच्या कार्यकाळात पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण हेमंत नगराळे यांनी काढून घेतले होते. या प्रकरणी बिल्डरने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने नगराळेंना झापलेही होते. महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण होते?

1) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड

2) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान

3) सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग

4) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मागे

डोसासोबतच्या चटणीतून माझ्यावर विषप्रयोग; ISRO च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा खळबळजनक गौप्यस्फोट
डोसासोबतच्या चटणीतून माझ्यावर विषप्रयोग; ISRO च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा खळबळजनक गौप्यस्फोट

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मधील एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्या....

अधिक वाचा

पुढे  

Sonu Sood | BMC ची सोनू सूद विरोधात तक्रार, भाजपच्या राम कदमांनी सांगितलं कारण
Sonu Sood | BMC ची सोनू सूद विरोधात तक्रार, भाजपच्या राम कदमांनी सांगितलं कारण

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) जु....

Read more