By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
तेहरान - इराण आणि अमेरिकेतील संघर्ष पेटला असतानाच इराणने पुन्हा एकदा इराकमधील बलाद येथे अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला असून यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत, या हल्ल्यात दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकारी आहेत.
दरम्यान, बलाद येथील लष्करी तळावर सुमारे आठ रॉकेट डागली आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच हल्ल्यात लष्कर प्रमुख कसिम सुलेमानचा खात्मा झाला होता. त्यामध्ये दोन्ही देशांमधील आक्रमकता विकोपाला पोहचली आहे. या बदल्यात अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर १२ क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा इराणने रॉकेट हल्ला केला आहे.त्यामुळे अमेरिका काय करणार याकडे लक्ष लागले आहे.
कळंबोली : खारघरच्या सेक्टर ३५ मध्ये १२ व्या मजल्यावरून कोसळून ....
अधिक वाचा