By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कुर्द कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुर्द सेनेचे प्रमुख होते. सुलेमानी हा पश्चिम आशियात ईराणी कार्यक्रम राबवण्यारा प्रमुख रणनीतिकार मानला जातो. सीरियात आपली मुळे घट्ट करणे, तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे हे आरोप सुलेमानी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दीर्घ काळापासून अमेरिका सुलेमानीच्या मागावर होती. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
"परदेशात राहणाऱ्या अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेसाठी कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचं पाऊल उचललं गेलं. अमेरिकेच्या अध्यक्षांनीच तसा आदेश दिला होता. सुलेमानी यांना अमेरिकेनं दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं," अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं दिली.
अमेरिकनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "२७ डिसेंबर रोजी इराकस्थित अमेरिकन सैनिकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यासह गेल्या अनेक महिन्यांपासून इराकमधील अमेरिकन सैन्याच्या चौक्यांवरील हल्ल्यांमध्ये सुलेमानी यांचा हात होता. गेल्या आठवड्यात अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यालाही सुलेमानी यांनीच परवानगी दिली होती." तसंच, "अमेरिकेनं केलेला एअरस्ट्राईक भविष्यातील इराणी हल्ल्यांना रोखण्याच्या उद्देशानं केला गेलाय. अमेरिका कुठंही असली तरी, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीची कारवाई सुरुच ठेवेल," असंही या पत्रात अमेरिकनं म्हटलंय.
जनरल कासिम सुलेमानी यांच्यावरील कारवाई मध्य-पूर्व आशियातील अत्यंत मोठी घटना मानली जातेय. इराण आणि इराण समर्थक शक्ती आता इस्रायल आणि अमेरिकेविरोधात उत्तरादाखल जोरादर पावलं उचलण्याची शक्यताह वर्तवली जातेय.
मुंबई - कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहण....
अधिक वाचा