By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मध्य रेल्वेने प्रवास करणे आता महागणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान चहा, नाश्ता आणि जेवणावर आता प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत रेल्वे बोर्डाच्या अन्न व पेय विभागाच्या संचालकांकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे (इतकंच नाही, तर या गाड्यांचे तिकीट घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचेही पैसे भरावे लागणार आहेत. त्याशिवाय, इतर गाड्यांमधील प्रवाशांनाही महागाईचा फटका बसणार आहे
राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, सेकंड एसीच्या प्रवाशांना चहासाठी आता 10 रुपयांच्या जागी 20 रुपये द्यावे लागतील, तर स्लीपर क्लासच्या प्रवाशांना 15 रुपये द्यावे लागतील. दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता किंवा जेवणासाठी सध्या 80 रुपये द्यावे लागतात. मात्र, नवे दर लागू झाल्यानंतर यासाठी 120 रुपये भरावे लागणार आहेत. तर सेकंड एसीच्या प्रवाशांना नाश्ता आणि जेवणासाठी 125 रुपेय नाही, तर 185 रुपये द्यावे लागतील. इतकंच नाही तर, सायंकाळच्या चहासाठी सेकंड क्लास एसीच्या प्रवाशांना 45 नाही, तर 90 रुपये द्यावे लागतील. तसेच, स्लीपर क्लासच्या प्रवाशांना सायंकाळच्या चहासाठी 20 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागतील.
राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस फर्स्ट एसी क्लास दर
सध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा 15 35
नाश्ता 90 140
जेवण 145 245
सायंकाळचा चहा 75 140
राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस सेकंड आणि थर्ड एसी क्लास दर
सध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा 10 20
नाश्ता 75 105
जेवण 125 185
सायंकाळचा चहा 45 90
राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस स्लीपर क्लास दर
सध्याचे दर नवे दर
सकाळचा चहा 10 15
नाश्ता 40 65
जेवण 80 120
सायंकाळचा चहा 20 50
इतर मेल/एक्स्प्रेचे दर
सध्याचे दर नवे दर
नाश्ता (व्हेज) 30 40
नाश्ता (नॉन-व्हेज) 35 50
जेवण (व्हेज) 50 80
जेवण (नॉन-व्हेज) 55 90
चार महिन्यांनंतर नवे दर लागू होणार
तिकीट सिस्टिममध्ये नवे पदार्थ आणि दर येत्या 15 दिवसांमध्ये अपडेट होतील. तर 120 दिवसांनंतर म्हणजेच चार महिन्यांनंतर हे नवे दर लागू करण्यात येतील.
या नव्या दरांमुळे फक्त प्रिमिअम गाड्यांतील प्रवाशांनाच नाही, तर इतर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांच्या खिशालाही फटका बसणार आहे. नेहमीच्या मेल गाड्या आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शाकाहारी जेवण 80 रुपयांना मिळेल, जे आज 50 रुपयांमध्ये मिळतं. रेल्वेकडून प्रवाशांना अंडा बिर्याणी 90 रुपयाला, तर चिकन बिर्याणी 110 रुपयांमध्ये दिली जाईल. तसेच, 130 रुपयांना चिकन करी देखील उपलब्ध असेल.
2014 नंतर पहिल्यांदा दरवाढ
‘सकाळच्या चहाच्या तुलनेत सायंकाळच्या चहाची किंमत जास्त आहे. याचं कारण म्हणजे, सायंकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई दिली जाईल. आम्ही रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसच्या गुणवत्तेत सुधार करायचा आहे. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
गेल्यावेळी 2014 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. रेल्वे बॉर्डाच्या परिपत्रकानुसार, आयआरसीटीसीची विनंती आणि बॉर्डाच्या मेन्यू अँड टॅरिफ कमिटीच्या शिफारसीनंतर हे दर वाढवण्यात आले आहेत.
राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच सत्तास्थापनेच....
अधिक वाचा