By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्याचे नाव इश्फाक अहमद सोफी असून तो एका दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. इश्फाक अहमद सोफी हा इस्लामिक स्टेट जम्मू कश्मीर या संघटनेच कमांडर होता. चकमकीदरम्यान त्याला सुरक्षा दलाने ठार केले आहे. इश्फाक अहमद सोफी संघटनेत अब्दुल्ला भाई म्हणून ओळखला जायचा. तो कश्मीरच्या सोपोर भागातला रहिवासी होता. त्याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. तर इश्फाकला ठार केल्यानंतर पोलिसांनी या भागातील सर्व शाळा आणि कॉलेजस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी एका चकमकीत इश्फाकचा मृत्यू झाला. इश्फाक अहमद सोफी कश्मीरमध्ये आयएसजेकेचा कमांडर होता. 2015 पासून तो हरकत-उल-मुजाहिदिन या अतिरेकी संघटनेपासून जोडला गेला होता. 2016 साली त्यांने हरकत-उल-मुजाहिदिन ही संघटना सोडून आयएसजेकेमध्ये सामील झाला होता. सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार शोपियन जिल्ह्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. तर दुसरीकडे एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर येत असतानाच य....
अधिक वाचा