By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
एकीकडे चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे समोर आले आहे. इस्त्रोची ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-२ या मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे.
नवीन मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहे. या मोहिमेत जपानची ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) आणि इस्रो एकत्रितपणे ही मोहिम राबवणार आहेत. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इस्त्रो आणि जाक्साचे वैज्ञानिक चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित मोहिम राबवण्याचा विचार करत आहेत.’
ही मोहीम २०२४ मध्ये इस्त्रो आणि जाक्साव्दारे सुरु करण्यात येणार आहे. त्याअगोदर भारत २०२२ ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा बंगळुरुमध्ये पहिल्यांदा २०१७ साली झाली होती. तसेच २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले असतांनाही या मोहिमेसंदर्भात चर्चा झाली होती.2019 मध्ये ‘जाक्सा’ने एका बटुग्रहावर यशस्वीपणे हायाबुसा-२ हे यान उतरवले.
22 जुलै रोजी इस्रो ने सोडलेले चंद्रयान 2 शेवटच्या टप्प्यात असताना विक्रम लँडरसोबत संपर्क तुटला होता. काल ओरबिटोरच्या माध्यमातून विक्रमचा संपर्क होऊन विक्रमची थर्मल इमेजेस इस्रोला मिळाली आहेत. अजून पुढे काही दिवस मिळणार्या माहितीनुसार विक्रम सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र त्या अगोदरच नव्या मोहिमेची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चंद्रयानमुळे ज्या आशा भारतीयांना आणि इस्रो ला होत्या त्या पुढील मोहिमेतून साध्य होतील अशी अपेक्षा कायम आहे.
चांद्रयान 2 च्या अखेच्या टप्प्यातील विक्रम लँडर संपर्क तुटल्याने चंद्रभूम....
अधिक वाचा