By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
एकी कडे सरकारी कर्मचार्यांना 7 वा वेतन आयोग लागू करणार्या केंद्र सरकार कडून चंद्रयान 2 यांच्या प्रक्षेपणात गुंतलेल्या त्या साठी दिवसरात्र मेहनत घेणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञाच्या वेतनात कपात करण्याचे धोरण आखले जात आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञाना 1996 पासून दोन अतिरिक्त वेतन वाढीच्या रूपात मिळत असलेला प्रोत्साहन भत्ता यापुढे मिळणार नसल्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. 12 जुलै रोजी हा आदेश जारी केले आहेत. या आदेशानतर ड ,ई ,फ आणि ग श्रेणीमधील शास्त्रज्ञाना प्रोत्साहन भत्यापासून वंचित राहावे लागणार आहे
इस्त्रो मध्ये जवळपास 16000 शात्रज्ञ व अभियंते आहेत. त्यातील सुमारे 85 ते 90 टक्के शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा ड, ई,फ,व ग श्रेणीमद्धे असून सरकारी आदेशामुळे त्यांचे दरमहा 9 ते 10 हजार रुपये नुकसान होणार आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ नाराज झाले असल्याचे कळते.
काकानबर्डी ते ओझर दरम्यान एरडोल कडे जाणार्या बसने एरडोल येथून पिंपळगाव ह....
अधिक वाचा