By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 17, 2020 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
“कोरोना लशीवर काम सुरु आहे. मात्र, फक्त लशीमुळे कोरोना संपू शकेल असं मानणं चुकीचं आहे” अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे
“कोणत्याही आजाराबद्दलच्या लशीची परिणामकारकता, ती लस आजाराचा उद्रेक किती प्रमाणात रोखू शकते यावर ठरत असते. कोराना लशीवर काम सुरु आहे. ही लस नवीन आहे. त्यामुळे लस घेतल्याने शरिरात प्रतिकारशक्ती किती काळ टिकणार ?, याचे उत्तर अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे फक्त लस कोरोनाला संपवू शकेल असं समजणं चुकीचं आहे,” असं डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.
राज्यात कोरोना संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र, अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीसारख्या शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप आवटे यांनी फक्त कोरोना लसच पूर्ण संसर्ग थांबवेल असं समजणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. जी लस तयार होत आहे, तिची शरिरात प्रतिकार शक्ती टिकवण्याची क्षमता किती आहे; याचे उत्तर अद्याप अनुत्तरीत असल्याचंही ते म्हणाले.
कोरोना लस भात्यामधलं एक महत्वाचं अस्त्र
जगात, अनेक ठिकाणी कोरोना लशीवर काम सुरु आहे. लशीमुळे बऱ्याच प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार आहे. त्यावर बोलताना कोरोना लस ही आपल्या भात्यातलं एक महत्त्वाचं अस्त्र आहे, असं डॉ. आवटे म्हणाले. तसेच, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणंही तितकचं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. लस कोरोना रोखण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे, पण त्यासोबत नॉन फार्मा मेडिकल उपाययोजना आवश्यक असल्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र स....
अधिक वाचा