By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 07:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
बाईकच्या चेनमध्ये ओढणी अडकल्याने एका सहा वर्षाच्या बालिकेच्या गळ्याला फास बसला आणि तिचे शीर धडावेगळे झाल्याची भयंकर घटना मंगळवारी राजस्थानमध्ये घडली आहे. गुनगुन असे मृत बालिकेचे नाव असून ती आई वडीलांबरोबर बाईकवरून भीमनगर भवानीमंडी येथे आपल्या घरी परतत होती. त्याचवेळी ही घटना घडली.
भवानीमंडी येथे राहणारे अजीत सिंह पत्नी परमजीत कौर व मुलगी गुणगुण यांना घेऊन मध्यप्रदेशमधील जीरापूर येथे गेले होते. गुणगुणच्या आईची तब्येत बरी नसल्याने ते तिला व गुणगुणला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. औषध घेतल्यानंतर ते तिघे घराकडे परतत होते. झालावाड जिल्हयात पोहचत असतानाच अचानक गुणगुणच्या गळ्यातील ओढणी बाईकच्या चेनमध्ये अडकली. काही कळण्याच्या आतच गुणगुणच्या गळ्याला ओढणीचा फास बसला. हा फास इतका घट्ट बसला की गुणगुणचे शिरच धडावेगळे झाले व दूर उडाले. गुणगुण आईच्या मागे बसल्याने आईला नक्की काय झाले ते कळालेच नाही व बाईकला जोरदार हिसका बसून ती पलटली. यामुळे अजीतसिंग व गुणगुणची आईदेखील खाली पडली आणि गुणगुणचे धड दुसरीकडेच पडले. रस्त्यावरून जाणार्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत अजीतसिंग व त्यांच्या पत्नीला सावरले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. मुलीचा शिर नसलेला मृतदेह पाहून अजीत सिंग व परमजीत कौर यांना भोवळ आली. त्यानंतर पोलिसांनी 200 मीटर दूर पडलेले गुणगुणचे शिर आणले.
पुणेमध्ये एक आनोखा विवाह सोहळ संपन्न झाला. या विवाह सोहळ्या दरम्यान जन्मभू....
अधिक वाचा