By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 06, 2021 10:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय हवाई दलाचं मिग -21 (MiG-21) विमान मंगळवारी संध्याकाळी राजस्थानच्या सूरतगड भागात क्रॅश झालं असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेदरम्यान विमानाच्या पायलटने मोठ्या हुशारीने स्वत:चा बचाव केला. तो सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे विमान क्रॅश झालं. या अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातामध्ये विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मलबा बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. पाक सीमेजवळ सूरतगड हवाई दल तळावरून विमानानं उड्डाण केलं आणि थोड्याच वेळात हा अपघात झाला.
अधिक माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात इंजिनला आग लागली आणि विमान क्रॅश धालं. वैमानिकाने कसा तरी स्वत: चा जीव वाचवला. यानंतर विमान एअरबेसच्या आवारात कोसळलं. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता विमानाने उड्डाण केलं आणि काही मिनिटातच इंजिनातून आग बाहेर येण्यास सुरवात झाली.
अशा कठीण परिस्थितीतही आग लागल्यानंतरही पायलटने विमानाला उंचीवर नेलं आणि विमान इजेक्ट होण्याआधीच विमानाची दिशा जमिनीच्या दिशेने केली. यामुळे, ते विमानतळाच्या परिसरात कोसळलं आणि लोकवस्तीच्या भागात याचा कोणताही धोका झाला नाही. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
A MiG-21 fighter jet of the Indian Air Force crashed near Suratgarh, Rajasthan today evening due to technical malfunction. The pilot managed to eject safely. A Court of Inquiry has been ordered to probe the accident.
— ANI (@ANI) January 5, 2021
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या हवाई दलाकडे सध्या फक्त 57 मिग -21 शिल्लक आहेत. हे विमान भारतीय हवाई दलात सुमारे 50 वर्षांपासून सेवा देत होतं. पण ते क्रॅश झाल्यामुळे हवाई दलाचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात ....
अधिक वाचा