ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कधी निघायचं, कुठे थांबायचं, कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या?‘अंतरवली ते मुंबई’ मोर्चाची रूपरेषा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कधी निघायचं, कुठे थांबायचं, कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या?‘अंतरवली ते मुंबई’ मोर्चाची रूपरेषा

शहर : जालना

पायी चाला, गाडीत बसा पण आता मुंबई गाठायचीच!; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. कोणत्या वस्तू सोबत घ्यायच्या? या मोर्चाचा मार्ग कसा असेल? मुक्काम कुठे असेल? यावर जरांगेंनी भाष्य केलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईला येणार आहेत. हा मोर्चा कसा असेल, याची रूपरेषा मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितली. याआधी प्रवासाचे टप्पे ठरले नव्हते. मात्र आता अंतरवली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे ठरले आहेत. त्यानुसार आपण मुंबईला जाणार आहोत. समाजाला हे सांगणं आवश्यक आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत. तसंच या मोर्चावेळी कोणत्या वस्तूसोबत घ्याव्यात, याबाबतही मनोज जरांगेंनी माहिती दिली आहे.

मोर्चाचा मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं

20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार

20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात

21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)

22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)

23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे

24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा

25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, नवी मुंबई

26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी पोहोचणार, आमरण उपोषणालाही सुरुवात

सकाळी 9 वाजल्या पासून 12 पर्यंत चालत जाऊयात. आपण देवाकडे जात नाही. आपल्या मागण्यासाठी सरकारकडे जातोय. ज्याला जमेल त्याने चालायचं. नाहीतर बिनधास्त गाडीमध्ये बासायचं. दुपारी 12 पर्यंतच सर्वांनी चालायचं आहे, अशा सूचना मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिल्या आहेत.

26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात

शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागतील. 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी त्यांच्या हद्दीपर्यंत वाटं लावायला यायचं आहे. पुण्यामध्ये मराठा समाजाच्या करोडोच्या आकड्यात असणार आहेत. सर्व प्रकारची वाहनं मुंबईकडे जाताना असणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचं आहे, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा बांधवांना सांगितलं आहे.

जरांगेंच्या आंदोलकांना सूचना

मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचं नाही. मुंबई जाताना प्रत्येकने स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे.ज्यांच्या कडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल घेऊन या. आपणच आपल्या लोकांची सेवा करायची आहे. आता लेकरासाठी मुंबईला जायचं आहे, असं आवाहन जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना केलं आहे.

आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. मी एकटा निघणार आहे, मग सोबत एक लाख असो की एक कोटी रोज पायी बारा वाजे पर्यंत चालायचं आहे. नंतर मुक्कामी पोहचायचं आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. सरकारला आता वेळ द्यायचा नाही, असंही जरांगे म्हणाले.

मागे

अयोध्येतील मालमत्तेचे दर गगनाला भिडले, कवडीमोल जमिनीचे भाव आता इतक्या पटीने वाढले
अयोध्येतील मालमत्तेचे दर गगनाला भिडले, कवडीमोल जमिनीचे भाव आता इतक्या पटीने वाढले

अयोध्येला पुन्हा एकदा मोठे महत्त्व आलं आहे. राम मंदिर जवळपास बनून तयार झाले ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांनो पाण्याचा साठा करुन ठेवा, ‘या’ दिवशी 24 तास पाणी येणार नाही
मुंबईकरांनो पाण्याचा साठा करुन ठेवा, ‘या’ दिवशी 24 तास पाणी येणार नाही

मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून शहरातील ....

Read more