By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - ऐन ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर उद्या, २५ डिसेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांना आणि चाकरमान्यांना रेल्वेच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
उद्या सकाळी ९.४५ मिनिटं ते १.४५ मिनिटं या कालावधीत ४०० मॅट्रिक टन वजनी ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर उभारण्यात येणार आहेत. त्यांमुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पूर्ण ५ तास बंद राहणार आहे. शिवाय एकूण १६ एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.
परिणामी ख्रिसमसकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ११०११ एलटीटी-नांदेड एक्सप्रेस, १६३३९ सीएसएमटी-नागरकोविल एक्सप्रेस, १७०३१ हैद्राबाद-सीएसएमटी एक्सप्रेसला दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालविण्यात येणार असून या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
- कल्याण-डोंबिवली दरम्यान ९.४५ मिनिटं ते १.४५ मिनिटं या कालावधीत लोकल वाहतूक बंद राहणार.
- दर २० मिनिटांनी कल्याण-कर्जत - कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
- दर १५ मिनिटांनी डोंबिवली - ठाणे-सीएसएमटी विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
- सीएसएमटी-दादर, कुर्ला, ठाणे या लोकल फेऱ्या वेळापत्रकानूसार धावतील.
२५ डिसेंबर रोजी (उद्या) रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस
-(११००९-११०१० ) सीएसएमटी-पुणे सिंहगड
-(१२१२३-१२१२४) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन
-(१२१०९-१२११०) सीएसएमटी-मनमाड पंचवटी
-(२२१०१-२२१०२) सीएसएमटी-मनमाड राज्यराणी
-(१२०७१-१२०७२) दादर-जालना जनशताब्दी
-(११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी
-(५११५३-५११५४) सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर
मुंबई - गोवंडी येथे साफसफाईसाठी सांडपाण्याच्या टाकीत उतरले....
अधिक वाचा