ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

न्यायालयाच्या दणक्यानंतर जम्मू-काश्मीरचे ब्रॉड बॅंड सेवा सुरू

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

न्यायालयाच्या दणक्यानंतर जम्मू-काश्मीरचे ब्रॉड बॅंड सेवा सुरू

शहर : delhi

         जम्मू : जम्मू-कश्मीरमधील इंटेरनेटसह इतर बंदी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकारला जाग आल्याचे दिसते. काश्मीरच्या घाटीत हॉटेल, शिक्षण संस्था आणि प्रवासासाठी ब्रॉड बॅंड सेवा सुरू करण्यात आले आहेत. तर जम्मूमध्ये 2 जी मोबाइल इंटरनेट सर्व्हिस सुरू करण्यात येणार आहे.

         जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार बहाल करणारे कलम ३७० हटवून केंद्र सरकारने या राज्याचे दोन भाग केले. जम्मू-कश्मीर वेगळे राज्य करीत लडाख हा केंद्राशासित प्रदेश केला. तथापि, हे करण्याआधीपासूनच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथील महत्वाच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र ४-५ महीने उलटले तरी जम्मू-कश्मीरमध्ये इंटरनेटवर घातलेली बंदी कायम होती. सहजिकच या संदर्भात आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले होते की, इंटरनेट हा जनतेचा अधिकार आहे. अनुच्छेद १९ मध्ये लोकांच्या इंटरनेट या स्वातंत्र्यासंबंधी उल्लेख आहे. त्यामुळे ते अनिश्चित काळासाठी बंद ठेवता येणार नाही. 

    न्यायालयाच्या आदेशानंतर वेगाने सूत्र हलण्यास सुरुवात झाली. या संबंधी जम्मू-कश्मीरच्या उपराज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर कश्मीर घाटीत ब्रॉड बॅंड सेवा तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.        
 

मागे

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ठरले जगातील आठवे आश्चर्य
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ठरले जगातील आठवे आश्चर्य

       नवी दिल्ली - सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वांत मोठा पुतळ....

अधिक वाचा

पुढे  

लघुउद्योजकांसोबत ऍमेझॉन करणार १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक    
लघुउद्योजकांसोबत ऍमेझॉन करणार १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक    

        नवी दिल्ली - लघु आणि मध्यम उद्योजकांच्या डिजिटलायझेशनसाठी ऍमेझॉ....

Read more