ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Jammu Kashmir : CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Jammu Kashmir : CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

शहर : देश

जम्मू आणि काश्मीर भागात सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवाया काही कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी ( ऑक्टोबर) ला काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर बेछूट गोळीबार केला. जम्मू काश्मीर पोलिसांच्या साथीनं ही जवानांची तुकडी पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कंदीझल पूलापाशी रोड ओपनिंग ड्युटीसाठी तैनात होती.

सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्य़ा या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तरतीन जवान जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्यानंतर जखमी जवानांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यानंतर महामार्गावर लगेचच वाहन प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय घटनास्थळ आणि त्यानजीकच्या परिसरात संरक्षण दलांनी शोधमोहिमही सुरु केल्याचं कळत आहे.

 

मागे

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे
राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. मात्र त्यांन....

अधिक वाचा

पुढे  

Credit Card वापरताय सावधान, कारण....
Credit Card वापरताय सावधान, कारण....

आता सध्या अनेक बँका आपल्या ग्राहकांना Credit Cardची सुविधा उपलब्ध करून देतात. मात्....

Read more