By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 08, 2021 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
थंडीच्या कडाक्यामुळे सध्या संपूर्ण देशाभर शीतलहरी सुरू आहेत. हवामानातील बदलांमुळे तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचल्यानंतर तुमचीही छाती अभिमानाने उंचावेल. या घटनेनं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. सैनिकांच्या अनेक प्रेरणादायी बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. हिमवृष्टीच्या वेळी सैनिकांनी एका गर्भवती महिलेला खांद्यावर बसवून रुग्णालयात दाखल केलं. याचा एक व्हीडिओही समोर आला आहे.
तुम्ही पाहताय हा फोटो जम्मू-काश्मीरमधला आहे. जम्मूच्या खोऱ्यात सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. अनेक रस्त्यांवर आणि घरांवर बर्फ पडला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे आरोग्य सेवाही कोलमडली आहे. पण अशा भीषण परिस्थितीतही भारतीय जवानांनी आपली माणुसकी सगळ्यांसमोर ठेवली आहे. त्यांच्या या कामाचं करावं तेवढं कौतूक कमीच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फार्कियान गावात एक महिला गर्भवती होती. तिला अचानक वेदना सुरू झाल्या. पण हिमवृष्टीमुळे तिला रुग्णालयात पोहचणं अशक्य होतं. यामुळे कुटुंबाने सीओबी करलपुरा इथं फोन करून मदतीची विनंती केली. अशा परिस्थितीत भारतीय सैनिक आणि काही स्थानिक लोक देवदूतासारखे धावून आले महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केलं.
Heavy snow in Kashmir brings unprecedented challenges for citizens, especially in higher reaches. Watch the Soldier & Awam fighting it out together by evacuating a patient to the nearest PHC for medical treatment. #ArmyForAwam#AmanHaiMuqam pic.twitter.com/DBXPhhh0RP
— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) January 7, 2021
भारतीय सैनिकांच्या कर्तव्याला सलाम
शबनम बेगम असं गर्भवती महिलेचं नाव होतं. शबनम यांना मदतीची गरज आहे अशी माहिती मिळताच भारतीय जवान तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी तिला खांद्यावर रुग्णालयात दाखल केलं. वेळीच महिलेवर उपचार झाल्यामुळे तिने एका निरोगी गोड बाळाला जन्म दिला आहे.
मुलगा झाल्याच्या आनंदात कुटुंबानेही सगळ्यांना मिठाई वाटली आणि भारतीय जवानांना मदतीबद्दल खास आभार मानले. इतकेच नाही तर संरक्षण मंत्रालयाचे पीआरो उधमपुर, मिनिस्ट्री ऑफ डिफेंस यांच्याकडून याचा एक व्हीडिओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये भारतीय जवान शबनम यांना हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जात आहेत हे दाखवण्यात आलं आहे.
पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदर....
अधिक वाचा