By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 07:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहे. वाळुंज हे चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रहिवासी होते. सोमवारी (21 ऑक्टोबर) त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं जाणार आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) मूळगाव भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. रविवारी (20 ऑक्टोबर) देखील जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये आपल्या देशाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. तसंच एक सामान्य नागरिकही मृत्युमुखी पडला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं कुपवाड्यातील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सीमेपलीकडून घुसखोर पाठवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं. या गोळीबारात परिसरातील दोन घरांचं नुकसान झालं. दरम्यान, या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.
#UPDATE Sources: Terrorist launch pads in PoK’s Jura, Athmuqam and Kundalsahi were targeted by Indian Army artillery guns last night after credible inputs came of significant number of terrorists operating there. pic.twitter.com/mICB8Z9P4K
— ANI (@ANI) October 20, 2019
दरम्यान, आज सकाळी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच पाकिस्तानचे सहा सैनिक ठार झाले असून 25 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. तर 35 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. भारताने याआधीही सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.
भारतीय जवानांनी तंगधार सेक्टरमधून तोफांना मारा केला. भारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅड उद्ध्वस्त झाले आहेत. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (शनिवारी) रात्री झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने सीमेपलिकडून गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहे. पाकिस्तानकडून शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. या गोळीबारात एक नागरिक देखील ठार झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले.काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी करण्यात आला होता.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच, ट्रेनला उशिर झाल्यामुळे प्रवाशां....
अधिक वाचा