By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
श्रीनगरमध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा दल आमने-सामने आले. शहरातील अमरसिंग कॉलेज आणि बेमिना डिग्री कॉलेज परिसरात विद्यार्थी बांदिपुरा बलात्कार प्रकरणाच्या विरोधात निदर्शने करत होते. यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षादलांत वाद निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांनी बांदिपुरा जिल्ह्यातील संभळ परिसरात तीन वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून आंदोलन छेडले. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू होती आणि ते बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातच पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. वाद हाताबाहेर जात असताना महाविद्यालय प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले आहे.
महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे ....
अधिक वाचा