By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत सासवड पूर्णपणे बंद राहणार आहे. आजपासून पुढील सहा दिवस कडकडीत बंद असणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सासवडकरांनी जनता कर्फ्यूची मागणी प्रशासनाकडे केली होती.
त्यानुसार वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आजपासून जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे जिल्ह्यात बारामती, वाघोली, भोरनंतर सासवडमध्येही जनता कर्फ्यू करण्यात आला आहे.
एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्....
अधिक वाचा