By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 03:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. त्यामुळे उद्या रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यायाच एक भाग म्हणून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी सुरक्षितेसाठी घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच रेल्वे सेवाही काही प्रमाणात बंद राहणार आहे. मुंबई लोकल अंशत: बंद राहणार आहे. तसेच जनता कर्फ्यूमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी - दादर पॅसेंजर, दादर -रत्नागिरी पॅसेंजर, रत्नागिरी - मडगाव लोकल, मडगाव - रत्नागिरी पॅसेंजर, मडगाव - सावंतवाडी पॅसेंजर, सावंतवाडी - दिवा आणि दिवा -सावंतवाडी पॅसेंजर, कारवार - पेरनेा डेमू पॅसेंजर, पेरना - कारवार डेमू पॅसेंजर, वास्को द गामा - येशवंतपूर साप्तहिक एक्स्प्रेस, येशवंतपूर- वास्को द गामा ही साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाड्या रद्द केल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीच्या कोकण रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेने सामाजिक हित जपण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे.
या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात
1) Train no. 50104 Ratnagiri - Dadar Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
2) Train no. 50103 Dadar - Ratnagiri Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
3) Train no. 50101 Ratnagiri - Madgaon Jn. Passenger dated 22/03/2020 will be canceled.
4) Train no. 50102 Madgaon Jn. - Ratnagiri Passenger dated 22/03/2020 will be canceled.
5) Train no. 50108 Madgaon Jn. - Sawantwadi Road Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled.
6) Train no. 50106 Sawantwadi Road - Diva Daily Passenger dated 22/03/2020 will be canceled. 7) Train no. 70102 Karwar - Pernem DEMU Passenger dated 22/03/2020 will be canceled.
8) Train no. 70101 Pernem - Karwar DEMU Passenger dated 22/03/2020 will be canceled.
9) Train no. 17310 Vasco Da Gama - Yesvantpur Bi-Weekly Express dated 21/03/2020, 23/03/2020, 28/03/2020 & 30/03/2020 will be canceled.
10) Train no. 17309 Yesvantpur - Vasco Da Gama Bi-Weekly Express dated 22/03/2020, 24/03/2020, 29/03/2020 & 31/03/2020 will be canceled.
कोरोना व्हायरस जगात चिंतेचा विषय ठरत असताना आता भारतात ही कोरोनाचा धोका वा....
अधिक वाचा