By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 07:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगभरातील 186 देशांमध्य कोरोना व्हायरस पोहोचल्यानंतर सगळ्याच देशांच्या चिंता वाढल्या आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पाहायला मिळत आहे. देशातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनतेने घरातच राहण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. ज्यामुळे हा व्हायरस आणखी पसरणार नाही. या अभियानात सहभागी होऊन स्वत:ला आणि दुसऱ्याला ही सुरक्षित ठेवायचं आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, नोएडा, लखनऊ, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरात लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. बस सेवा, टॅक्सी सेवा आणि रेल्वे देखील बंद राहणार आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
Maharashtra: Deserted roads in Nagpur following commencement of #JantaCurfew from 7 am today. Prime Minister Narendra Modi had appealed for the self-imposed curfew in his address to the nation on 19th March. #COVID19 pic.twitter.com/0gDMsyAXar
— ANI (@ANI) March 22, 2020
कोरोनाच्या विरोधात हे युद्ध जिंकण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यामुळे लोकांनी आजच्या दिवशी घरातच राहणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरातून याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. लोकांनी स्वत: या बाबत जनजागृती करण्यास सुरवात केली होती.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वेकडून महत्त्वाची पावलं उचलली गेली आह....
अधिक वाचा