By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या दिवा परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या बैठ्या चाळींवर आज जेसीबी चालवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तेथील राहणार्या सर्व रहिवाशींनी जेसीबी वर हल्ला चढवण्यात आला आहे. वातावरण तापल्याने पोलीस आणि स्थानिकांची धुमाकूळ उडताना दिसत आहे.
कोर्टाच्या आदेशानुसार दि. ६ जानेवारी सोमवार सकाळीच तहसीलदारांनी कारवाई करायला सुरुवात केली. या परिसरात ५०० ते ६०० चाळींच साम्राज्य असलेल्या त्यात काही चाळींवर आज जेसीबी फिरवण्यात आले.
तहसीलदारच्या या निर्णयामुळे काही स्थानिक रहिवाशांचा राग अनावर झाल्यामुळे जेसीबीवर चढून तरुण-तरुणी, लहानमुले, महिलाही हल्लाबोल करताना दिसत होत्या. या प्रकरणात ५०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसिलदारांची संपूर्ण टिम तेथे उपलब्ध असूनसुद्धा स्थानिकांनी जेसीबीला घेराव करून अडवले होते.
कोर्टाच्या सांगितलेल्या माहितीनुसार दिव्यातील चाळीची जागा खारफुटी आणि अनधिकृत जमिनीवर बांधण्यात आल्या आहेत. बिल्डर लॉबी आणि लोकप्रतिनिधींनी एकमेकांचे विचार जुळवून केलेल्या निर्णयावर नागरिकांनी आरोप केला आहे.
नागरिकांच्या सांगण्यानुसार या चाळींना १० ते १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या आधी तुम्ही झोपले होते काय? तेव्हा का नाही थांबवलं? असा सवाल संतप्त स्थानिकांनी तहसीलदारांना केला
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातच विद्य....
अधिक वाचा