By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 04:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रचंड कर्जभारामुळे जमिनीवर आलेल्या खासगी हवाई कंपनीचा नवा खरेदीदार कोण हे स्पष्ट होण्यास दिवस शिल्लक असतानाच संकटांचा ससेमिरा जेट एअरवेजला अद्यापही चुकवता आलेला नाही. दिवसेंदिवस जेट एअरवेजसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. यादरम्यान जेट एअरवेजच्या कर्मचार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा एकदा जेटला उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीदेखील मध्यस्थी करण्याचं आश्वासन दिलं आहे.
जेट एअरवेजच्या कर्मचार्यांनी आपण कमी पगारातही काम करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. ‘आम्ही कमी पगारात काम करण्यास तयार आहोत. पण जेट एअरवेज पुन्हा सुरु व्हावं अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी 23 मे नंतर सरकार मध्यस्थी करेल असं आश्वासन दिलं आहे’, अशी माहिती एका कर्मचार्याने दिली.
हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध 18 व्यापारी बँकांचे 8,000 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचार्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने दोन आठवडयांपासून तिची विमाने जमिनीला खिळली आहेत. कंपनीचे मुख्य प्रवर्तक नरेश गोयल यांना जेटमधील अध्यक्षपद गमवावे लागल्यानंतर कंपनीसाठी नव्याने खरेदीदार शोधण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली आहे. त्यात स्वारस्य असणार्यांचा कल शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
एका महिलेची तक्रार ऐकून पोलीसही उडाले आहेत. रोज मेरी एम. या महिलेने साडीच्या....
अधिक वाचा