By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटांत असलेली जेट एअरवेज आज अधिकृतरित्या शेवटची उड्डाण घेत आहे. बॅंकांच्या ग्रुपतर्फे 400 कोटी रुपयांचे त्वरित कर्ज उपलब्ध न झाल्याने एअरलाईन्सने ही घोषणा केली. आठ हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या एअरवेजचे बंद होणे हे एविएशन सेक्टरसाठी मोठा झटका मानला जात आहे. साधारण 22 हजार कर्मचाऱ्यांच्या परिवारावर याचा परिणाम होणार आहे.
आर्थिक संकटांनी घेरलेल्या 'जेट एअरवेज'ला अद्याप १५०० करोड रुपयांची मदत अजूनही मिळू शकलेली नाही. नागरी विमानचालन महासंचलनालयानं (DGCA) जेट एअरवेजच्या आठ विमानांची नोंदणी रद्द केलीय. या विमानांना आता दुसऱ्या एअरलाइनला भाड्यानं देऊन उड्डाणं सुरू केली जाऊ शकतात. उड्डाणं कमी होऊन त्याचा ताण प्रवाशांच्या खिशावर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. नागरी विमानचालन महासंचलनालयानं (DGCA) जेट एअरवेजच्या आठ विमानांची नोंदणी रद्द केली. या विमानांना आता दुसऱ्या एअरलाइनला भाड्याने देऊन उड्डाणं सुरू केली जाऊ शकतात. उड्डाणं कमी होऊन त्याचा ताण प्रवाशांच्या खिशावर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
जेट एअरवेजची फ्लाईट सर्व्हिस बंद झाल्यानंतर ती बॅंकांच्या नियंत्रणाखाली आली असून यासाठी आता बोली लावली जाणार आहे. एतिहाद एअरेवज, रा एनआयआयएफ, टीपीजी आणि इंडिगो पार्टनर हे चौघेजण बोली लावण्याच्या रांगेत आहेत. बोलीच्या प्रक्रियेतून नरेश गोयल यांनी आधीच स्वत:ला वेगळे केले आहे. चारही बोली दात्यांकडे बोली लावण्यासाठी 10 मे पर्यंतचा वेळ आहे.
सध्या जेट एअरवेजची मालकी सरकारी बँकांनी घेतली असून खासगी गुंतवणूकदारांना कंपनी विकण्यासाठी बोली लावण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नरेश गोयल यांनी आणखी खासगी गुंतवणूकदाराच्या मदतीने बोली लावण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहोत. पण नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने कंपनीच्या व्यवस्थापनातून बाजूला व्हावे, अशी अट बँका आणि काही परदेशी गुंतवणूकदारांनी घातली. त्यानुसार नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोयल यांनी व्यवस्थापन मंडळातून राजीनामा दिला.
परभणीतील मानवत तालुक्यातील शेवडी येथे मतदारांना सूचना करण्याच्या कारणावर....
अधिक वाचा