By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 04:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जेट एअरवेजने 17 एप्रिलला त्यांची सर्व उड्डाणे बंद केल्यानंतर आता विमानतळावरील कार्यालय व काऊंटरही बंद केले आहे. यामुळे तिकीट परताव्यासाठी अर्ज करणे बंद झाले आहे. दरम्यान जेट संदर्भात निर्णयाची मुदत 10 मे रोजी संपत असल्याने कर्मचार्यांची असवस्थता शिगेला पोहोचली आहे. आर्थिक चणचणीमुळे जेट एअरवेजने 17 एप्रिलला सर्व उड्डाणे स्थगित केली. त्यानंतर मुंबई व दिल्ली वगळता देशभरातील उर्वरित सर्व कार्यालये बंद केली. तसे असले तरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काऊंटर सुरू होते. तिकीट परतावा मागण्यासाठी प्रवाशांना या काऊंटवर अर्ज जमा करण्याची सोय होती. आता कंपनीने ते काऊंटरदेखील बंद केले आहे.
प्रचंड कर्जभारामुळे जमिनीवर आलेल्या खासगी हवाई कंपनीचा नवा खरेदीदार कोण ह....
अधिक वाचा