By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 04:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : amlabad
झारखंड – उत्तर भारतासह अनेक राज्य थंडीने गारठली असून जमशेदपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थंडीने कुडकुडणा-या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या एका महिलेने आपल्या दोन महिन्याच्या चिमूरड्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला दोन हजारत रुपयात विकले.
टाटानगर येथील रेल्वे स्थानकाबाहेर चाईबासा स्टँड आहे. तेथे ही महिला आपल्या एक वर्षाच्या मुलासोबत व दोन महिन्याच्या मुलीसोबत राहते. परंतु कडाक्याच्या थंडीमध्ये भीक मागून पोट भरणे तिला कठीण वाटू लागले. त्यातही कधी कधी काहीच भीक न मिळाल्याने तिच्यासह मुलांनाही उपाशी पोटी झोपावे लागते.
ही स्थिति तिला असह्य झाल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे तेथील रेल्वे कर्मचा-यांनी सांगीतले आहे. तसेच महिलेला अधिक माहिती विचारली असता मी त्याचा जीव वाचविण्यासाठी मन घट्ट करत हा निर्णय घेतला आहे जर तसे केले नसते तर माझ्या बाळाचा थंडीने व भुकेने जीव गेला असता असेही तिने सांगितले. देशभरात पसरलेल्या थंडीमुळे अनेकांचा बळी गेला असून काही राज्यात थंडीचा पारा अधिक घसरत आहे.
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरक....
अधिक वाचा