ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Jio चे कॉलिंग आणि डेटा पॅक महागणार; ४० टक्क्यांची दरवाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 08:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Jio चे कॉलिंग आणि डेटा पॅक महागणार; ४० टक्क्यांची दरवाढ

शहर : देश

रिलायन्स जिओकडून आपल्या मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार आहे. येत्या ६ तारखेपासून जिओकडून नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्वीपेक्षा ४० टक्क्यांनी महागणार आहे. या निर्णयामुळे जिओचा फायदा ३०० टक्क्यांनी वाढणार आहे. ६ डिसेंबरपासून सुरु जिओकडून ऑल इन वन प्लॅनची अंमलबजावणी होईल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड मोबाईल कॉल आणि डेटा सुविधा मिळेल. तर दुसरीकडे वोडाफोन-आयडियाने आपल्या नवीन प्रीपेड प्लानचे दर वाढवले आहेत. या नव्या प्लान अंतर्गत व्हाईस कॉल आणि डेटाचे दर महागणार आहेत. येत्या ३ डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागतील.

यापैकी २९९ आणि ३९९ रुपयांचे पॅक ३ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तर ३९९ रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता असेल. ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, ६ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळेल. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा दररोजसह १०० एसएमएस मिळणार आहे. तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज आमि १०० एसएमएस मिळणार आहे.

मागे

LPG सिलिंडरच्या दरातही वाढ, जाणून घ्या काय आहेत नवे दर
LPG सिलिंडरच्या दरातही वाढ, जाणून घ्या काय आहेत नवे दर

गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आधीच महागाई, पेट्रोल दरवाढीचे ....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद....

Read more