ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले आईशी घोषसह ९ हल्लेखोरांचे फोटो

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले आईशी घोषसह ९ हल्लेखोरांचे फोटो

शहर : delhi

       नवी दिल्ली - जेएनयूमधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांची ओळख पटवली आहे. त्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जेएनयूमध्ये रविवारी रात्री सर्व्हर रूममध्ये हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं आढळून आलं आहे. 

 


      जेएनयूच्या हिंसेबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटलं आहे. एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ आणि डिएसएफ आदी विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थांना नोंदणी करण्यापासून रोखले होते. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते, असं टिर्की यांनी म्हटलं आहे. तसेच “मी कोणतीही चूक केलेली नाही. माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा माझ्याकडेही माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पुरावे आहेत” असं आइशी घोषनं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मागे

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; दोन जवान शहीद 
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; दोन जवान शहीद 

         श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने प्रच....

अधिक वाचा

पुढे  

चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 
चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 

          मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्....

Read more