ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराविरोधात सुरु असलेलं आंदोलन मुंबईतही मागे 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 02:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराविरोधात सुरु असलेलं आंदोलन मुंबईतही मागे 

शहर : मुंबई

          मुंबई - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत सुरु असलेलं आंदोलन आज मागे घेण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानात हलवलं होतं. संवेदनशील जागा असल्याने पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून हटण्यास सांगितलं होतं.

 

             आझाद मैदानात गेल्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान यावेळी आंदोलक आंदोलनस्थळ सोडत असताना पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचं ओळखपत्र तपासलं. पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची नावंदेखील नोंद करुन घेतली आहेत. यासाठी अनेक पोलीस कर्मचारी वही घेऊन बसले होते.

 

        जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवलं. तसंच त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

 

              “आम्हाला पोलिसांनी जबरदस्ती आझाद मैदानात नेलं होतं. परंतु आम्ही ‘ऑक्युपाय गेटवे’ हे आंदोलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन यशस्वी झालं आहे. असं असलं तरी आमचा विरोध कायम राहील. आमच्याकडे अनेक नियोजित कार्यक्रम आहेत,” अशी प्रतिक्रिया आंदोलक कपिल अग्रवाल याने दिली.

मागे

जुन्या एमआयडीसीत भीषण आग; कंपन्या जळून खाक!
जुन्या एमआयडीसीत भीषण आग; कंपन्या जळून खाक!

          सातारा - सातार्‍यातील एमआयडीसीमध्ये दोन कंपन्यांना भीषण आग....

अधिक वाचा

पुढे  

एसबीआयमध्ये झिरो बॅलेन्स बचत खाते काढायचे आहे? वाचा...
एसबीआयमध्ये झिरो बॅलेन्स बचत खाते काढायचे आहे? वाचा...

           एसबीआय, एचडीएफसी, एक्सिस, बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय अशा दे....

Read more