ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेएनयू हिंसाचारप्रकरण: मुंबई, पुण्यात मध्यरात्री निदर्शने

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 01:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेएनयू हिंसाचारप्रकरण: मुंबई, पुण्यात मध्यरात्री निदर्शने

शहर : मुंबई

           नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्लेखोरांची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत.

 

        दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. रविवारी मध्यरात्री मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ फ्लॅश मॉब केला. तर काहींनी गेट वे ऑफ इंडियावर कँडल मार्च काढत आपला निषेध नोंदविला.

 

          पुण्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने केली. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईत आज दुपारी चार वाजता हुतात्मा चौकात अभाविपच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.

 

         दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे.

मागे

ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम 
ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम 

        अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे ढग दाटले असताना अमेरिकेचे राष्....

अधिक वाचा

पुढे  

बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भीषण आग
बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भीषण आग

           पुणे - बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भ....

Read more