By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दहा महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर नियम व अटींसह सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झाली. रेल्वे प्रवास बंद असल्यामुळे बस, टॅक्सीचा पर्याय निवडणारे प्रवासी स्थानकात तुटून पडले आणि पहिल्याच दिवशी स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान मुंबईकरांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर मध्य रेल्वेवर संध्याकाळी 6 पर्यंत साडे चौदा लाख लोकांनी प्रवास केला. रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. सहा नंतर आणखी 5 ते 6 लाख लोकांनी प्रवास केल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्य्क्त करण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही सोमवारी संध्याकाळी ६ पर्यंत साडे अकरा लाख प्रवाशांनी प्रवास केला. या वाढत्या प्रवाशी संख्येमुळे रेल्वेला साधारण दीड कोटींचं उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर येतेय.
अतिरिक्त प्रवाशांचा प्रवास
1 फेब्रुवारीपासून सर्व सामान्यांसाठी सुरु झालेल्या लोकलमधून पहिल्याच दिवशी तिकीट खिडक्यांसमोर गर्दी पाहायला मिळाली. प्रवासाचा वेळ ठराविक असल्याचे इतर दिवसांपेक्षा प्रवासी संख्येतही वाढ झालेली दिसली. नेहमीपेक्षा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चार ते पाच लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आलंय.
पासची विक्री
वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे दोन्ही मार्गावरील तिकिटांची आणि पासची विक्री वाढली आहे. सोमवारी संध्याकाळी सहापर्यंत 11 लाख 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला तर पश्चिम रेल्वेवर 14 लाख 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला.
'प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देताना 1 फेब्रुवारीपासून पुढे अशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात येईल. यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये', असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुण्याच्या (Pune) एल्गार परिषदेत ( Elgar conference) हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान (objection....
अधिक वाचा