ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्युनियर श्री किताब पटकावणार्‍या बॉडीबिल्डरची राहत्या घरी आत्महत्या

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्युनियर श्री किताब पटकावणार्‍या बॉडीबिल्डरची राहत्या घरी आत्महत्या

शहर : virar

         विरार : ज्युनियर श्री पटकावणारा शरीरसौष्ठवपटू अली सलोमनी याने विरारमधील राहत्या घरी गळफास आत्म हत्या केल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस आले आहे. एकच घळबळ  उडाली आहे.  पत्नी घरी आल्यानंतर तिला अली बेडरुममधील पंख्याला लटकलेला पाहून तिने आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले. 

      अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक परिस्थितीत अडकल्याचे म्हटले जात होते. आर्थिक परिस्थितीला कंटाळून अलीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. अलीबरोबर त्यांची पत्नी आणि दोन मुली व एक मुलगा असा लहान परिवार आहे.

      सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ विरार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बॉडीबिल्डर अली सलोमनी याने तीन वेळा ‘वसईश्री’, एकदा ‘दहिसरश्री’ आणि ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ हे किताब पटकावले होते. अलीची आत्महत्या ही आर्थिक विवंचनेतूनच झाली असावी का?  की त्यामागे अन्य काही कारण आहे का? या प्रकरणाचा  अधिक तपास विरार पोलीस करीत आहेत. 

मागे

डब्ल्यू.एच.ओ. कडून जागतिक आणीबाणी घोषणा
डब्ल्यू.एच.ओ. कडून जागतिक आणीबाणी घोषणा

           वुहान : चीनमध्ये 'कोरोना'मुळे २१३ नागरिकांचे बळी घेऊन जव....

अधिक वाचा

पुढे  

म्हाडाच्या घरांची आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक
म्हाडाच्या घरांची आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक

      मुंबई : आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक फसवणुकीचे गुन्हे होत असतात.....

Read more