ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

न्यायालयाच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 07:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

न्यायालयाच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप

शहर : मुंबई

पाटणा उच्च न्यायालयाचे प्रशासनच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांना संरक्षण देत आहे. असा गंभीर आरोप वरिष्ठ  न्यायाधीश राकेश कुमार यांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पाटणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. राकेश कुमार यांना नोटिस पाठवीत ते कोणत्याही याचिकेवर सुनावणी करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कारण त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत.

न्या. राकेश कुमार यांनी माजी आयपीएस अधिकारी रमैया प्रकरणाची सुनावणी करताना आपल्या सहकारी न्यायाधीशांवर मुख्य न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसारच काम करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच रमैया यांना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून जामीन नाकारल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळण्यावर आक्षेप घेतला होता. वरिष्ठ न्यायालयांनी जामीन नाकारलेला असताना कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन कसा दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. बुधवारी सुनावणी दरम्यान न्या. राकेश कुमार यांनी म्हटले आहे की, जे अधिकारी भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी. त्याऐवजी साधारण शिक्षा देवून त्यांना सोडून दिले जात आहे. न्या. कुमार यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना सुनावणी करण्यापासून रोखण्यात आले.

 

मागे

पाक कमांडो गुजरात मध्ये घुसण्याच्या तयारीत
पाक कमांडो गुजरात मध्ये घुसण्याच्या तयारीत

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा जळजळाट सुरू आहे. त्यातच ....

अधिक वाचा

पुढे  

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था
कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असंख्य चाकरमानी खास बाप्पासाठी वि....

Read more