By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये ५ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांचा देखील समावेश होता. ६३ वर्षांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रंजन गोगोई यांची जागा घेतली आहे. त्यांचा सरन्यायाधीश म्हणून १७ महिन्यांचा कार्यकाळ असले. २३ एप्रिल २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निर्णय़ दिले आहेत.
Delhi: Justice Sharad Arvind Bobde sworn-in as the 47th Chief Justice of India. pic.twitter.com/f47aS4wipv
— ANI (@ANI) November 18, 2019
शरद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये २४ एप्रिल १९५६ ला झाला. नागपूर यूनिवर्सिटीमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ मध्ये ते बार काउंसिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य होते. त्यानंतर १९९८ मध्ये ते वरिष्ठ वकील म्हणून काम करत होते.
२९ मार्च २००० साली ते मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. १६ ऑक्टोबर २०१२ ला ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात ते १२ एप्रिल २०१३ ला न्यायाधीश बनले.
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीचा पहिला हात देण....
अधिक वाचा