ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकिस्तानच्या गोळीबारात गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे ज्योतिबा चौघुले शहीद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकिस्तानच्या गोळीबारात गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे ज्योतिबा चौघुले शहीद

शहर : कोल्हापूर

रविवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील महागावच्या ज्योतिबा चौघुले शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये पाक सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे. हेलिकॉप्टरमधून त्यांचा मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आला आहे. मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

चौघुले मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे राहणारे आहेत. २००९ साली चौघुले सैन्यदलात दाखल झाले होते. उद्या दुपारी महागाव गावात त्यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

रविवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. रात्री .३०च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानने उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजर सेक्टरमधील निवासी भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. दुपारनंतर नियंत्रण रेषेला लागून आसलेल्या बखतूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे ग्रामस्त घरात लपून बसले आहेत. भारतीय सैन्य देखील या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुंछ आणि राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी उरी सेक्टरमध्ये देखील पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं होतं.

 

मागे

कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक
कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक

              मुंबई  -  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा वांदा हा क....

अधिक वाचा

पुढे  

कर्जबाजारी शेतकरी कांदा विकून झाला करोडपती
कर्जबाजारी शेतकरी कांदा विकून झाला करोडपती

            कर्नाटक - देशभरामध्ये सध्या कांद्याच्या वाढलेल्या दरांनी स....

Read more