By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : achhnera
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. शार्ट सर्किट झाल्याने धुराचे लोट डब्यांमध्ये घुसू लागले. यामुळे प्रवाशांमध्ये धावपळ झाली. ट्रेनच्या चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यानंतर आग विझविण्याचे काम सुरु झाले आहे. फायरब्रिगेडच्या दोन गाड्या आग विझविण्याचे काम करत आहेत. अद्याप कोणीतीही जिवीत हाणी झाल्याचे वृत्त नसून दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिर्झापूरच्या कैलहट रेल्वे स्थानकाच्या जवळ सकाळी 11.30 च्या सुमारास कामाख्या एक्स्प्रेस जात होती. यावेळी ट्रेनच्या जनरेटर बोगीमध्ये शार्ट सर्किट झाल्याने आग लागली. यानंतर चालकाने तातडीने या बोगीपासून अन्य डबे बाजुला केल्याने पुढील अनर्थ टळला.
तुमच्या वडिलांच्या पाठीराख्यांनी त्यांची ’मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा त....
अधिक वाचा