By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : navi Mumbai
कामोठे येथील सेक्टर-6 मध्ये काल एका बेदरकार स्कोडा कारचालकाने 7 जणांना उडवले. यात 7 वर्षाच्या सार्थक चोपडे व 32 वर्षाचा वैभव गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आणखी पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही स्कोडा गाडी रयत शिक्षण संस्थेच्या शाखेजवळ येताच चालकाचा ताबा सुटला. त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला दुचाकीला धडक दिली. नंतर उलट दिशेने वाहन नेले रस्त्याच्या कडेने चालणार्या पादचार्यांना उडवले. तरीही गाडी न थांबता पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला धडकली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बाजारातील गंगाजळीचा मोठा प्रवाह थोपवण्यासाठी बँकेत निश्चित रक्कमेपेक्षा ....
अधिक वाचा